व्यायाम आणि मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करताना काय काळजी घ्याल ?
#exercise, #psychiatry, #depression, #stress, #psychology
व्यायाम हा केवळ वजन कमी करणे यासाठी केला जात नाही, तर तो सर्वसाधारण शरीराचा फिटनेस, चपळाई, डौल सुधारण्यासाठी केला जातो. व्यायाम केल्याने शरीराला व मनाला अनेक फायदे मिळतात. ते खालील प्रमाणे:
शरीराला मिळणारे फायदे:
-
शरीर तंदुरुस्त, चपळ व लवचिक बनते.
-
आळस कमी होतो.
-
ह्रदयाची मुळची गती कमी होते, त्यामुळे ह्रदयाचा फिटनेस सुधारतो.
-
ताण किंवा अचानक येणारे संकट किंवा आजारपण झेलण्याची शरीराची क्षमता वाढते.
मनाला मिळणारे फायदे:
-
मनाला सवय व शिस्त लागते. वेळेचे नियोजन करण्याची सवय लागते.
-
व्यायामुळे endorphins ही नैसर्गिक संप्रेरके शरीरात स्त्रावली जातात, ज्यामुळे मन नैसर्गिक रित्या प्रसन्न राहायला मदत होते.
-
cardio सारख्या व्यायामामुळे मनावरील ताण, राग, चिडचिड कमी होण्यास मदत होते.
-
relaxation, stretching सारख्या व्यायामामुळे मनाला शांत होण्याची, व शांत होऊन विचार करण्याची सवय लागते.
व्यायामासंबंधी लक्षात ठेवण्याचे काही नियम:
1) व्यायाम कधी करावा?
दिवसातील कोणत्या ही वेळेस व्यायाम करता येतो. तरी शक्यतो सकाळी लवकर, किंवा सायंकाळी व्यायाम करावा. व्यायाम का कामाशी जोडलेला असू नये: उदा: जर तुम्ही कामासाठी रोज स्टेशन वर चालत जाऊन बस पकडत असाल, तर तो व्यायाम नव्हे. व्यायाम करताना, शरीर दमले तरी चालेल, पण मन हे शांत व व्यायामाच्या स्थितीत असले पाहिजे. कामाच्या साठी केले जाणारे कष्ट व हालचाल त्यावेळेस मन कामाच्या जबाबदऱ्या यांचा विचार करत असते. त्यामुळे व्यायाम हा शक्यतो कामासाठी केलेल्या हलचाळीपेक्षा वेगळा असावा.
2) कोणता व्यायाम करावा?
व्यायाम करताना, बहुतेक सर्व कोणताही मोठा, गंभीर व हालचाली साठी अडथळा निर्माण करणार आजार नसेल, तर आठवड्याला साधारण 150 ते 200 मिनिटे एकूण व्यायाम करावा. यात, साधारण
-
50 ते 60 टक्के कार्डियो व्यायाम (जस चालणे, पळणे, सायकल चालवणे, पोहणे, कोणताही खेळ खेळणे हे व्यायाम येतात),
-
20 ते 30 टक्के stretching व्यायाम (जसे abs training, विविध स्नायू चे व्यायाम, योगासने)
-
व राहिलेला 10 ते 20 टक्के relaxation व्यायाम (यात शवासन करणे, प्राणायाम, किंवा इतर कोणताही mindfulness व्यायाम करता येतात).
3) व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी.
व्यायाम सुरू केल्यानंतर केवळ वजन व कमरेचा घेर या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. शरीराचा फिटनेस कसा बदलतो याकडे लक्ष द्या. त्यासाठी खालील गोष्टीकडे लक्ष द्या:
- व्यायाम करताना किती दम लागतो.
- व्यायाम करताना किती वेळा थांबून विश्रांती घ्यावी लागते.
- व्यायाम केल्यानंतर किती वेळ शरीर दुखत राहते.
- तेवढाच व्यायाम करण्यासाठी किती वेळ लागतो?
- व्यायाम सुरू केल्यावर झोप, भूक यांच्यामध्ये काही फरक पडला आहे का?
- व्यायाम सुरू केलयावर वर्तणूक, मानसिक स्थिति, कार्यक्षमता यात किती सुधारणा झालेली आहे?
व्यायाम सुरू केल्यावर या सर्व गोष्टी कशा बदलतात याकडे लक्ष ठेवा.
4) व्यायाम करताना डाएट करणे महत्वाचे आहे का?
डाएट म्हणजे चौरस, पोषक आणि संतुलित आहार घ्या. जर एखादा आजार असेल, तर त्या आजारपूरता आहारात काय बदल करावा हे तुमच्या डॉक्टर ना भेटून निश्चित करा. व्यायाम करताना पुरेसे पानी (दिवसात 2-2.5 लीटर प्या).
5) व्यायाम निवडताना काय काळजी घ्याल?
नियम क्रमांक 2 मध्ये सांगितल्या प्रमाणे, कोणताही व्यायाम तुम्ही निवडू शकता. ते निवडताना खालील गोष्टी पहा.
- तुमच्या शरीराची स्थिति. कोणते व्यायाम करणे तुम्हाला निषिद्ध नाही ना याची खात्री करणे.
- तुमची आवड: तुम्हाला एकट्याने व्यायाम करायला आवडेल, की ग्रुप मध्ये.
- तुमचे काम व कामाच्या वेळा: वेळेचे नियोजन करायला हे गरजेचे आहे.